Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्यासाठी तब्बल १८ लाखांची फसवणूक

व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्यासाठी तब्बल १८ लाखांची फसवणूक
, शनिवार, 12 मार्च 2022 (07:57 IST)
व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्यासाठी तब्बल १८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक  पोलिसांनी कुणाल राजेंद्र खैरनार , बडदेनगर सिडको व हेमंत राजेंद्र ओसवाल रा.हिरावाडी रोड नवीन आडगाव नाका  या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी हैद्राबाद येथील एकाने थेट सायराबाद पोलिस स्थानकात तक्रार केल्यानंतर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणात सायराबाद येथील सायबर क्राईमचे पोलिस नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नाशिकच्या पोलिसांनी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेत या आरोपींनी गजाआड केले आहे. या आरोपींनी फॅन्सी नंबर देण्याचे बहाण्याने  तब्बल १८ लाख १९ हजार रुपये फिर्यादीकडून घेतले. त्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर यांचा शोध फिर्यादीने घेतला. पण, ते न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायराबाद पोलिस स्थानकात धाव घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Budget 2022 : विकासाची भरारी घेणारा अर्थसंकल्प सादर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे