Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत पहिले मराठी अभिमत विद्यापीठ

मुंबईत पहिले मराठी अभिमत विद्यापीठ
, सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:24 IST)
राज्यातील पहिले मराठी अभिमत विद्यापीठ  मुंबईतील वांद्रे भागात  स्थापन होणार आहे. मंगळवारी  मराठी राजभाषा दिनाच्या मुहूर्तावर विद्यापीठासाठीच्या जागेचं हस्तांतरण होणार आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला आणि हॉटेल ताज या वास्तूंच्या मधल्या जागेत मराठी अभिमत विद्यापीठ उभ राहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेत ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभं राहणार आहे. अन्य राज्यांमध्ये त्या-त्या भाषांची विद्यापीठं आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंदी विद्यापीठ आहे, मात्र आजपर्यंत मराठी भाषेचं विद्यापीठ नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हे अभिमत विद्यापीठ ग्रंथाली वाचक चळवळीने पुढाकार घेऊन हे स्थापन करायचं ठरवलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समाजसुधारक सावरकर