मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून, आज कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला चढवला. या हल्ल्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. दोन्ही राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानची बससेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. वातावरण शांत होईपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor