Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gadchiroli : वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

lighting strike
, मंगळवार, 25 एप्रिल 2023 (10:01 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे एका कुटुंबावर वीज पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. एका लग्न समारंभातून परत येताना झाडाखाली विसावा घेत असलेल्या एका कुटुंबावर वीज कोसळून पती -पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भारत राजगडे (35), अंकिता भारत राजगडे (28), बाली भारत राजगडे (2 ), देवाशी भारत राजगडे (4) अशी मयताची नावं आहेत. 

आमगाव बुटी गावात वास्तव्य करणारे भारत राजगडे आपल्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्न समारंभाला गेले होते. गावाला परत येताना रस्त्यात त्यांना पाऊस लागला. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे ते रस्त्यालगत एका झाडाखाली उभारले. काळाने तितक्यात झडप घातली आणि ज्या झाड खाली ते पावसापासून संरक्षणासाठी उभारले होते. त्याच झाडावर वीज कोसळून चौघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. अवघे कुटुंब क्षणातच उध्वस्त झाले. या घटनेमुळे आमगाव बुटी गावात हळहळ व्यक्त केली जातात असून शोककळा पसरली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून  शेतीचं खूप नुकसान झालं आहे. वीज कोसळून अनेक जनावरे देखील दगावले आहे. चंद्रपुरात एका शेतकऱ्याच्या सुमारे 36 शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असून शेतीच्या पिकांचं देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Archery World Cup: विश्वचषकात रिकर्व्ह तिरंदाजी संघाला रौप्य, विजेतेपदाच्या सामन्यात चीनकडून पराभव