Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गडचिरोली : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची तिस-यांदा धमकी

dharmrao baba atram
, बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (09:00 IST)
social media
गडचिरोली : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली. पुन्हा एकदा नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील दुर्गम नक्षलग्रस्त गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली.
 
मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारची धमकी पत्रकातून देण्यात आली. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत कार्यरत काही लोकांचीदेखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांना तिस-यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे.
 
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सद्यस्थितीत नक्षलग्रस्त जिल्ह्यात झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते. मात्र, इतर ठिकाणी त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात येत आहे. आत्राम यांना अधिवेशनात झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र आत्राम हे शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तरी त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे हे नवलच आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : पुण्यात वाढले बांगला देशी घुसखोर, तीन बांगलादेशी नागरिकांना अटक