Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganeshotsav 2021: कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाप्पाचे ऑनलाईन दर्शन

Ganeshotsav 2021: कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाप्पाचे ऑनलाईन दर्शन
, मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (19:45 IST)
यंदा 10 सप्टेंबरला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.पण यंदा सलग दुसर्याद वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने आता कडक नियमावलीत, अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे.
  
मुंबईत गणेशोत्सव काळात 24 तास गणपती मंडळांमध्ये गर्दी असते. चलतचित्र, आकर्षक देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. पण यावर्षी कोरोना संकटामुळे यावर निर्बंध आहेत. लालबाग, परळ,गिरगाव भागामध्ये असणारी अनेक गणेश मंडळं यंदा भाविकांच्या गर्दीविना सुनी सुनी असणार आहेत. पण बाप्पा आणि त्यांच्या भाविकांमधील अंतर कमी करण्यासाठी सुरक्षित दर्शनासाठी अनेक मंडळांनी यावर्षी ऑनलाईन दर्शन खुले ठेवलं आहे. राज्य सरकारने यावर्षी जारी केलेल्या कोविड 19 नियमावलीनुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये 4 फूटाची मूर्ती असेल. तसेच मंडपामध्ये 5 पेक्षा अधिक लोकांना एकावेळी परवानगी नसेल.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळमध्ये कोरोना मंदावत आहे? 24 तासांमध्ये 25772 नवीन प्रकरणे आढळली, पॉजिटिविटी रेटही कमी झाले