Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganeshotsav 2022: गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी 2 हजारहून अधिक बसेस सोडणार

st buses
, रविवार, 21 ऑगस्ट 2022 (14:34 IST)
येत्या 31 ऑगस्टला आराध्य दैवत गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूशखबर आहे. एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी 2 हजार 310 गाड्या  सोडण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र पाऊस सुरु आहे. अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच महाड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे आपातकालीन परिस्थितीसाठी 100 अतिरिक्त गाड्यांचीही व्यवस्था महामंडळाकडून करण्यात आली आहे.
 
 दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी ज्यादा एसटी बसेस धावत असतात, म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाने यावेळी 2 हजार 310 ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ज्यादा गाड्या कोकणात जाण्यासाठी 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी 5 सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत.यंदा 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीसाठी गाड्या तैनात असतील.यंदा कोरोना निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GANESH CHATURTHI ESSAY IN Marathi : गणेश चतुर्थी वर निबंध