Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठवाडा, नगरसाठी गंगापूर धारण समुहातून शेवटचे आवर्तन, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग

gangapur dharan
, मंगळवार, 14 मे 2019 (11:50 IST)
गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले असून, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहचेल. इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये एकूण फक्त १८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. उशिरा का होईना पाटबंधारे विभाग प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  मुकणे, दारणा, वालदेवी, कडवा धरणांतून २ हजार १०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात येणार असून, दुष्काळात सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दारणा काठच्या भागातील गावांनाही याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पाणी दारणा धरणातून नदीमार्गे नांदूरमध्यमेश्वरच्या डाव्या व उजव्या कालव्यातून वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहत्याला सोडण्यात आले. पुढील पंधरा दिवस पाणी वहन मार्गावर रोज २२ तास थ्रीफेज वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, दारणा, मुकणे नदीचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. दारणा व मुकणे धरणाचे पाणी संयुक्तरित्या औरंगाबाद, वैजापूर, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहता या शहरांची तहान भागविणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत दोन विमानांची हवेत टक्कर, 5 जणांचा मृत्यू