Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

मुंबईतील घरांमध्ये महानगर गॅस मीटरचे स्फोट

gas meter
, बुधवार, 3 एप्रिल 2019 (16:53 IST)
डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात महानगर गॅसकडून पाईपद्वारे गॅस काही सोसायट्यांमध्ये देण्यात आला असून, शर्वरी सोसायटी मधील तीन घरांमध्ये गॅस मीटरचे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मध्ये कोणाही जखमी किंवा अनुचित घटना घडलेली नाही. रहिवासी मात्र भीतीने घराबाहेर पडले होते. याबाबत महानगर गॅसच्या संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. पण अद्याप कोणीही आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी निलेश काळे यांनी सांगितले.महानगर ही शहरी भागात सामायिक रीत्या गॅस वितरीत करते यामध्ये सोसायटी आणि अनेक घरांना मिळून एकत्र गॅस पुरवला जातो तर जसे पाणी आणि बीज बिल असते तसे गॅस चे वापर किती आणि कसा यावर मीटरमध्ये नोंद होते. जितका गॅस वापरला गेला आहेत तितके पैसे मोजावे लागतात तर सोबतच कधीही गॅस संपेल याची भीती मात्र नसते त्यामुळे नागरिक या सुविधेचा अधिक प्रमाणात वापर करतात त्यामुळे आर्थिक फायदा होतो. ही गॅस व्यवस्था शहरी भागातील सोसायटी परिसरात फार लोकप्रिय होत आहे. मात्र याप्रकारे मीटरचा स्फोट झाल्याने अडचणी वाढण्याची आणि सुरक्षाव्यवस्था यावर प्रश्न चिन्ह निर्माण होणारे आहेत. त्यामुळे यावर लवकर कारवाई करावी आणि योग्य ते बदल करून सुरक्षा द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतही मोठा धोका उद्भवू शकणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांनी साथ द्यावी ही माझी शेवटची निवडणूक - सुशीलकुमार शिंदे