गौतमी पाटील आणि वादाशी काही नातं आहे. गौतमी आपल्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे चर्चेत असते. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. नाशिकच्या एका जिल्हापरिषद शाळेच्या पटांगणात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम झाला. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम शांततेत कोणताही गोंधळ न होता पार पडला.
नाशिकात दिंडोरी तालुक्यात वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात मोठे मोठे स्पिकर्स लावण्यात आले असून ही शाळा मद्याच्या ब्रॅण्डसाठी प्रसिद्ध असलेल्या सिग्राम कंपनीने दत्तक घेतली असून गौतमीचा हा कार्यक्रम मोफत ठेवण्यात आला होता. दिवसांत सुरु असणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मुळे आता शाळा जे विद्येचे घर म्हणतात देखील गौतमीच्या नृत्यासाठी बुक केली जाणार की काय असा प्रश्न उदभवत आहे.