Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घुशीने वृद्धेचा हात कुरतडून पंजाच केला नष्ट, वृद्धेचा मृत्यू

death
, शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (21:28 IST)
नाशिकमधील गंजमाळ भागात गटारीचे काम झाले.  मात्र  त्यानंतर या ठिकाणी कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळे सदरच्या परिसरात घुशी फिरत आहे. यातूनच रात्री येथील झोपडीत राहणाऱ्या बबाबाई गायखे (९०) वृद्धेचा हात घुशीने कुरतडल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना  जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातच मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला. 
 
याठिकाणी महापालिकेने गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने परीसरात उंदीर आणि घुशी मेाठ्या प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे गटारींचे कॉंक्रीटीकरण तातडीने पूर्ण करावे अशी नागरीकांची मागणी होती. मात्र, महापालिकेच्या ठेकेदाराने दाद दिली नाही. त्यातच बबाबाई गायखे या वृद्धेचा हात कुरतडून जवळपास पंजाच नष्ट केला. ही महिला अत्यंत वृद्ध असल्याने फार आरडाओरड करू शकली नाही. अखेरीस सामाजिक कार्यकर्ते दिपक डोके यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खेड बायपास झाला खुला, पुणे-नाशिक प्रवासाचा अर्ध्या तास झाला कमी