Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगावात महिला छेड छाडीच्या घटनांचा उच्चाक तक्रार आता पालकमंत्री महाजन यांचे कडे करा

जळगावात महिला छेड छाडीच्या घटनांचा उच्चाक तक्रार आता पालकमंत्री महाजन यांचे कडे करा
, सोमवार, 1 जुलै 2019 (09:56 IST)
जळगाव येथील महाविद्यालयीन परिसरात सध्या रोडरोमिओनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून सराईत गुन्हेगारांचा देखील मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामध्ये आता महिलांच्या तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेड छाडीच्या घटनांचा शहरात सध्या उच्चाक गाठला आहे. यासंदर्भात अनेक तक्रार येतात मात्र काही जण तक्रार करण्यास बदनामी होईल म्हणून घाबरतात याकरिता थेट जलसंपदामंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत, छेडछाडी सारखे प्रकार घडल्यास थेट जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांच्या कडे तक्रार करता येणार आहे. तक्रार दाराने आपली तक्रार पालकमंत्री कार्यालयात दिल्या नंतर तक्रार दाराचा परिचय गुप्त ठेवल्या जाईल, तक्रारदार महिला अथवा महाविद्यालयीन विद्यार्थिनींना (मुल,मुली) न्याय मिळे पर्यत खुद्द पालकमंत्री गिरीषभाऊ महाजन स्वतः पाठपुरावा करणार आहे. अशा छेडछाडी रॅगिंग च्या घटना संदर्भात तक्रारी असल्यास कोर्ट चौकातील जी एम फोडेशन च्या कार्यालयात तक्रारी स्वीकारल्या जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती लागल्यास ना.गिरीषभाऊचे जनसंपर्क अधिकारी अरविद देशमुख यांच्या ७०५८८ ७२५२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोंढव्यातील संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू प्रकरणी बिल्डर अग्रवाला बंधूना पोलिस कोठडी