Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार द्या : बाळा नांदगावकर

सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार द्या : बाळा नांदगावकर
, गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (08:21 IST)
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक भयावह रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था करोना विषाणूवरील लसीचं संशोधन करण्यात अग्रणी आहे. त्यांचं इतक्या वर्षांचं योगदान लक्षात घेता सायरस पुनावाला यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
 
मनसेचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे. “सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युट च्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही विनंती”, असे ट्विट त्यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bye Bye 2020: नोकरीसाठीचे हे महत्त्वपूर्ण निर्णय, सरकारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा ही त्यांच्यात सर्वात महत्त्वाची