महाराष्ट्र-कर्नाटक वादावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवर आक्रमक भूमिका घेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठोस भूमिका घेत नसल्याची टीका राऊतांनी केली होती.
तसंच, मुख्यमंत्री शिंदे काहीच बोलत नसल्यानं त्यांना कुलूप निशाणी द्यायला हवी, असा टोलाही राऊतांनी लगावला होता.
यावर आता शिंदे गटातूनही उत्तर देण्यात आलंय. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं की, संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात चमचा निशाणी मिळाली पाहिजे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
“संजय राऊत आणि ती 'उबाठा सेना' काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करण्यामध्ये वेळ घालवत आहेत. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चमचेगिरी करण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात चमचा ही निशाणी मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे करणार आहोत,” असं प्रतापराव जाधव म्हणाले.