Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, थेट अमित शाह यांच्याकडे केली मागणी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, थेट अमित शाह यांच्याकडे केली मागणी
, मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (21:50 IST)
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे गटात काही दिवसांपूर्वी दाखल झालेले राहुल शेवाळे आणि अन्य खासदारांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा,अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
"आता शिवसेनेचे बहुतांश खासदार हे एनडीएत आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही मराठी भाषा अस्मितेचा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलंय", असं शेवाळे यांनी यावेळेस स्पष्ट केलं. तसेच गृहमंत्री शाह यांनीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आश्वासन दिलंय, असंही शेवाळे यांनी नमूद केलं.
"गृह, सांस्कृतिक आणि शिक्षण या तीन मंत्रालयात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ जावा लागतो. सध्या हा विषय साहित्य अकादमीकडे आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल", असं उत्तर राज्य सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत काही महिन्यांपूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिलं होतं. गृहमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत आश्वासन दिल्याने समस्त मराठीजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी कारवाई, लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणारी टोळी पकडली