स्वस्त उड्डाणांसाठी परिचयाच्या असलेल्या गो एअर या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं आपल्या क्रू अलाव्हंस आणि फ्युअल रिअंबर्समेंटमध्ये १० टक्क्यांची कपात केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (आर्थिक) एस.के.सिंह यांनी दिली. याव्यतिरिक्त वैमानिकांना देण्यात येणारा एन्टरटेममेंट अलाव्हन्सही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोएअरकडून कर्मचाऱ्यांना विना वेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय कमी कालावधीत कंपनीची स्थिती टिकवून ठेवण्यासाठी घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.