माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकावर आता खटला चालणार आहे. गुरविंदर सिंह असे चालकाचे नाव आहे. ३ जून २०१४ ला दिल्लीतील मोतीबाग परिसरात ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. यात मुंडे यांचे निधन झाले. याप्रकरणात गुरुविंदर सिंह याच्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानूसार दिल्ली सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे.