Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे - जयंत पाटील

भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे - जयंत पाटील
, सोमवार, 10 मे 2021 (22:43 IST)
कोविन-अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 
 
कोविन-अ‍ॅप मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व 'OTP'साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अ‍ॅपवरून जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. केंद्रसरकारने यावर तात्काळ विचार करावा असेही जयंत पाटील म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधानांनी आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजे -सीडब्ल्यूसी