राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यांनी डिस्चार्ज झाल्यानंतर थेट राजभवन गाठले. आता राज्यात सुरु असलेल्या बंडखोरीवर राज्यपाल काय पाऊल घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहेत.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताकारणाची सूत्रे बदलताना दिसत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारला असून सध्या ते आसामच्या गुवाहाटी येथे आहे. बंडखोर नेत्यांची संख्या जवळपास 40 असल्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आली असून राज्याचे कामकाज कोलमडले आहे.
बंडखोरांना विरोध म्हणून शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालय, घरात तोडफोड सुरु केली असून शक्ती प्रदर्शने सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उद्भवत आहे. सध्या राजकीय वातावरण तापले असून राज्यात शांतता राहावी या साठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
आता या राजकीय घटनाक्रमावर राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.