Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यायालयाने गोविंदाची केस बंद केली

न्यायालयाने गोविंदाची केस बंद  केली
, गुरूवार, 13 जुलै 2017 (14:24 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

16 जानेवारी 2008 रोजी गोविंदाने संतोष रायला कानाखाली लागवली होती. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर गोविंदाने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्याचप्रमाणे संतोषला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली असून केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांत समेट घडवण्याचा सल्ला दिला होता. 

तू हिरो आहेस, तू कोणाला कानशिलात कशी लगावू शकतोस? असे न्यायालयाने गोविंदाला विचारले होते. तुझे चित्रपट आम्ही एन्जॉय करतो. मात्र तू कोणाला मारावेस, हे आम्ही सहन करु शकत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफ यातला भेद तू समजून घ्यायला हवास. मोठा हिरो आहेस, मन पण मोठं कर. सामान्य माणसाला चपराक लगावणं तुला शोभत नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक