छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. स्मारक पाहताक्षणीच मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला.
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खा. डॉ. अमोल कोल्हे, अशोक पवार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भीमा - भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी हे स्मारक साकारण्यात येणार आहे. या परिसरात भव्य शिल्प, ॲम्फिथिएटर, प्रवेशद्वार, इमारत, घाट, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, इतर पायाभूत सुविधा आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.