नागपुरात स्किझोफ्रेनियाने ग्रसित व्यक्तीने स्मशानभूमीच्या चौकीदारावर हल्ला करून त्याचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना रविवारी दुपारी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसबाग परिसरात घडली.घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.मयत व्यक्ती आरोपीच्या वडिलांचा जवळचा मित्र होता. हा खून का केला अद्याप कळू शकले नाही. चौकीदार रमेश लक्ष्मणराव शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी हा स्किझोफ्रेनियाच्या आजाराने ग्रसित आहे. तो मोटारसायकिलने स्मशानभूमीत पोहोचला त्याने मयत व्यक्तीशी बोलून काही मिनिटांतच धारदार शस्त्राने गळाचिरून खून केला. शिंदे खाली कोसळले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.या घटनेनन्तर काही जण धावत आले आणि त्यांना लोकांनी तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. लोकांनी आरोपीला पकडून मारहाण केली. आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आजारी आहे त्याला स्किझोफ्रेनिया आजार आहे तो या प्रकरणाबद्दल विसंगत विधाने करत आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.