Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी

shirdi
अहमदनगर , गुरूवार, 5 मे 2022 (21:33 IST)
राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे.
भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणीच शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भोंग्याचा वाद सुरू झाल्याने कालपासून शिर्डीतील काकड आरती भोंग्यांविना करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शिर्डीत येणारे साईभक्त नाराज झाले आहेत. मुस्लिम समाजातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शिर्डीतील जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सहापूर्वी मशिदीत होणारी अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, शिर्डीतील मुस्लीम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरु करावी. शिर्डीतून राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरु करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL: कोहलीचा व्हिडिओ पाहून चाहते विचारतात- तुम्ही धोनीला शिवीगाळ केली का?