Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवयवदानातून चौघा रूग्णांना जीवनदान

अवयवदानातून चौघा रूग्णांना जीवनदान
, सोमवार, 20 जानेवारी 2020 (15:32 IST)
नाशिकमधून ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून अवयवदानसाठी पुण्यातील बाणेर येथे एका युवकाचे अवयव पोहोचविण्यात आले. यामुळे चौघा रूग्णांना जीवनदान मिळाले आहे.
 
या घटनेत रोजगारासाठी नाशिकमध्ये राहात असलेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. नोकरी आटोपून दिंडोरीरोडवरून दुचाकीने घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिलन यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत घोषित केले. यानंतर कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेडटीसीसी) रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली. केंद्राकडून बाणेर येथील ज्यूपिटर व पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात गरजू रूग्ण असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार दोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयव वरील रूग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास शहर वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडोर’मधून पोहचविण्यात आले. यावेळी सुमारे तीन तासांत २२० किलोमीटर अंतर कापत रूग्णवाहिका बाणेरला रूग्णालयात पोहचली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला