Publish Date: Wed, 10 May 2017 (10:27 IST)
Updated Date: Wed, 10 May 2017 (10:29 IST)
जीएसटीबाबत शिवसेनेने केलेल्या सर्व अर्थात तीन मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जीएसटीची अमलबजावणी सुरू झाल्यावर महापालिकांच्या वाट्याचे उत्पन्न कमी होणार असल्याची शंका शिवसेनेला आहे. त्यामुळे जीएसटीबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. त्यानंतर या मुद्द्यावर शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
जीएसटी विधेयकाची प्रत द्या, मग पाठिंब्याबाबत विचार करू असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जीएसटीला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.