गुढीपाडवा विशेष: श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात फुलांची आकर्षक आरास

बुधवार, 25 मार्च 2020 (12:34 IST)
चैत्र गुढी पाडवा अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रूख्मिणी मंदिरात फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांसाठी बंद आहे. भाविक सध्या दर्शन घेऊ शकत नाही. दरम्यान मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
 
प्रत्येक मोठ्या सणाला तसेच उत्सवात मंदिरात आरास करण्यात येते. मंदिरात चाफा, मोगरा, गुलाब आणि तुळस अशा 150 किलो फुलांची आरास करण्यात आली आहे. आकर्षक फुलांने मंदिरातील गर्भगृह, कमान सजविण्यात आली आहे.
 
आरसमुळे विठ्ठल रखुमाई अतिशय मनमोहक दिसत आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख चीनची कंपनी ओप्पो, विवो, रियलमीचे भारतातील मॅन्यूफॅक्चरींग प्लांट बंद