Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडव्याला मास्क मुक्ती होणार? राजेश टोपे म्हणाले..

गुढीपाडव्याला मास्क मुक्ती होणार? राजेश टोपे म्हणाले..
, बुधवार, 30 मार्च 2022 (14:37 IST)
सध्या कोरोनाची लाट ओसरत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाल्यामुळे सर्व कोरोनाचे निर्बंध काढण्यात आले आहे. तज्ज्ञाच्या म्हण्यानुसार जरी कोरोनाची लाट ओसरली आहे तरी ही मास्क लावणे आणि सोशल डिस्टेंसिंग पाळावेच लागणार. सध्या कोरोनाच्या प्रमाणात घट  झाल्यामुळे आणि सर्व कोरोनानिर्बंध काढण्यात आल्यामुळे आता मास्क पासून येत्या गुढी पाडव्यापासून मुक्ती मिळणार का ? अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्र टास्कफोर्सशी चर्चा करून या संदर्भातील निर्णय लवकरच घेतले जातील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले असल्यामुळे सर्व सणवार उत्साहाने आणि आनंदाने साजरे करावे असेही टोपे म्हणाले. आम्ही मास्क मुक्तीच्या संदर्भात टास्कफोर्सशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.
 
सध्या काहीदिशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. काही देशात कोरोनामुळे लॉक डाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे आपण एवढे निष्काळजी होऊन चालणार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा आवर्जून वापर केला पाहिजे. जेणे करून कोरोनाचा प्रसार होऊ नये.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2.7 लाखात एक किलो आंबा, सुरक्षेसाठी CCTV आणि गार्ड