केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकट आलं असल्याचे म्हटलं आहे.यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं आहे.शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणावर संकट आलं असल्याची टीका केली आहे.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात संकट आलं आहे.अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.परंतू नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत.अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. सध्या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. संकटात सापडलेल्यांना तातडीनं मदत करायला हवी ही वेळ राजकारण करण्याची नाही. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. जेव्हा वेळ असते तेव्हा तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन राजकारणात उतरु असे वक्तव्य शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.