Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

हल्ल्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवा : सोमय्या

हल्ल्याचा तपास  केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवा : सोमय्या
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (08:05 IST)
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. 
 
या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आणि पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे.  खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यास गेलो होतो. पण पोलिसांनी बनावट एफआयआर दाखल केला, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असेही  सोमय्या यांनी याचिकेत नमूद केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

DC vs KKR PL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला