Publish Date: Thu, 02 May 2019 (18:21 IST)
Updated Date: Thu, 02 May 2019 (18:24 IST)
पुण्यात दिवसा भर दुपारी हत्याकांड घडले आहे. यामध्ये पुणे-सातारा रस्त्यावर नारायणपूरजवळ भर रस्त्यात एकाची निघृत हत्या करण्यात आली आहे. या व्यक्तीचे ना हसन शेख असं असून त्याचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हसन शेखवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
यावेळी शेखच्या कारला चित्रपटात दाखवतात तशी बोलेरो कार धडकवून मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या होती, त्यानंतर त्याच्यावर जीवघेणे वार करुत शेखची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात भर दुपारी, भर रस्त्यात हा थरार रंगला होता. घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे.नारायणपुरातून कारने हसन शेख निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी बोलेरो गाडीने त्याच्या कारला धडक दिली.
अक्षरश: फिल्मी स्टाईलने त्याच्या कारला धडक मारुन गाडी रोखली. त्यानंतर थेट त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाही तर हसन शेखला गाडीतून बाहेर काढून त्याच्यावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला करुन मारेकरी घटनास्थळावरून पसरा झाले आहेत.
सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हसन शेखवर या अगोदर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा 2015 मध्ये त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यावेळी तो गंभीर जखमी झाला. त्या हल्ल्यातून बचावलेला हसन शेख काही दिवस कोमात होता.