Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्याध्यापकाची आत्महत्या ३ पानाची सुसाईड नोट.. २३ जणांवर गुन्हा

suicide
, मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (21:35 IST)
बीड  जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड मधील ही घटना आहे. बीडच्या एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आणि मागे ३ पानांची सुसाईड नोट सोडली. या सुसाईड नोटच्या माध्यमातूनच २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी केलेल्या अधिक तपासानुसार पैशांच्या तगाद्याला कंटाळून मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. बीड शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर काही दिवसांपूर्वी एका मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला आज आठवडा उलटला आहे. त्यांनी आठवडाभरापूर्वी आयुष्य संपवलं होतं. भरत सर्जेराव पाळवदे (Bharat Sarjerao Palvde) असं आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचं (Principal committed suicide) नाव होतं. ते बीडच्या केज तालुक्यातील जिवाचीवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
 
बीड शहरातील या घटनेत जिल्हा परिषद कार्यालया समोर ५ डिसेंबरला एका मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजेच्या आसपास मुख्याध्यापकांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी (६ डिसेंबर) सकाळी मृत शरीराचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
 
शवविच्छेदनात याही पेक्षा धक्कादायक माहिती समोर आली. मुख्याध्यापकांनी गळफास घेण्य आधी विषारी द्रव्य प्राशन केलं होतं. त्यांनी विष प्रश्न करून रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या समोर एका हॉटेलच्या आडूला दोरीने गळफास घेतला. दरम्यान त्यांच्या मृतदेहा शेजारी सापडली ती तीन पानांची सुसाईड नोट. त्याचप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या तगाद्यामुळे मुख्याध्यापकांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. तीन पानांच्या या सुसाईड नोटमध्ये एकूण २३ जणांच्या नावाचा समावेश होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर २३ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान भरत पाळवदे यांनी ऊसतोड मजुरांना देण्यासाठी पैसे घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. मात्र पैसे देऊनही ऊसतोड मजूर कामावर येत नव्हते आणि ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले त्यांनी मात्र मुख्याध्यापकांकडे पैशासाठी तगादा लावला होता आणि याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये रिलायन्स लाईफ सायन्सच्या तब्बल ४२०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता