Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युक्रेनच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पदवीसाठी आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार

amit deshmukh
, गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:25 IST)
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी युध्दजन्य परिस्थितीमुळे देशात परतले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तात्पुरता व ऐच्छिक स्वरुपाचा तीन महिने कालावधीचा डिजिटल कन्टेंन्ट उपलब्ध करुन दिला आहे. डिजिटल कन्टेंन्टचा शुभारंभ विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते गुरुवार, दि. 07 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12ः30 वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा.कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
 
विद्यापीठाचे मा.कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व शासनाच्या पाठबळामुळे डिजिटल कटेंन्ट तयार करणे शक्य झाले आहे. युध्दामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ व इल्सेविअर ¼Elsevier½ या संस्थेच्या विद्यमाने डिजिटल कटेंन्ट तयार केला आहे. या माध्यमातून ऐच्छिक व ऑनलाईन स्वरुपाचे शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे त्यांनी सांगितले. याचबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून MUHS App तयार करण्यात आले आहे.  सर्वच क्षेत्रात डिजिटल उपकरणे मोठया प्रमाणात वापरण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तसेच विद्यापीठातर्फे घडणाऱ्या घडामोडी विद्याथी, शिक्षक, पालक व अभ्यागतांना स्मार्ट मोबाईल फोनवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठाकडून MUHS App तयार करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ www www.muhs.ac.in  वरुन विद्यार्थी नोंदणी करु शकतात. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेंन्ट निशुल्क उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाने सामाजिक दायीत्व लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न केला आहे. सदर ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात परीक्षा, नोंदणी, अध्ययन पूर्ण केल्याबाबतचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही अथवा सांगता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. सदर डिजिटल कन्टेंट वापरतांना अडचणी आल्यास  इल्सेविअर चे अधिकारी श्री. अमित मोदी, श्री. अंकुश रॉय, श्री. रविराज शिंगारे, श्री. राहूल सिंह  मार्गदर्शन करणार आहेत.

आरोग्य विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोनमधील प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेल्या MUHS App ॲपव्दारा विद्यापीठाची माहिती, व्हिजन डॉक्युमेंट, बृहत आराखडा, राष्ट्रीय सेवा योजनांची माहिती, विविध उपक्रम, आंतरवासियता योजना संदर्भात माहिती, डिजिटल लायब्ररी, शिक्षक व विद्यार्थी यांना संशोधनाकरीता देण्यात येणारे अनुदान आदी बाबतची माहिती या ॲपव्दारा उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या मा.कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून सर्व समावेशक ॲप तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल कटेंन्ट व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरीता MUHS App उद्घाटनाचा कार्यक्रम https://youtu.be/JNTDGymeRQM   या यु-टयुब चॅनेलवरुन गुरुवार, दि. 07 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12ः30 वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच सदर कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन जंगलात आत्महत्या !