भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला वर्ग करण्यावर देखील सोमवारीच सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी वेळ मागितला असल्याने, सुनावणी सोमवारी होणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आणि आपली बाजू मांडली होती. यावर न्यायालयाने शनिवार दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील न्यायालयात आज हजर झाले होते मात्र सरकारी विशेष वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करत वेळ मागितल्याने ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.