कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या साहिल गांगुर्डे या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आठवडा बाजार असल्याने आई- वडिलांनी साहिलसाठी मिठाई आणली होती. शाळा सुटल्यानंतर साहिल नेहमीप्रमाणे घरी आला आणि त्याने मिठाई खाल्ली. त्याचवेळी घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कट झाल्याने तो पतंग पकडण्यासाठी साहिल जोरात धावला.
पतंगाच्या मागे धावताना त्याला दम लागला जेव्हा वडील भाऊसाहेब गांगुर्डे आणि आई सोनाली यांना ही बाब कळाली तेव्हा ते त्याला लगेच गावाच्या प्रायवेट दवाखान्यात घेऊन गेले.
पण साहिलची तब्बैत गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोपरगाव येथे भरती करण्याचा सल्ला दिला पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि हृदयविकाराच्या धक्क्याने त्याच मृत्यू झाला.