Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयद्रावक: कोरोना काळात काम गेलं.. नाशिकच्या इंजिनिअरची आत्महत्या

हृदयद्रावक: कोरोना काळात काम गेलं.. नाशिकच्या इंजिनिअरची आत्महत्या
, सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (08:14 IST)
कोरोना काळात काम गेलं आणि नैराश्याने ग्रासलं म्हणून नाशिकच्या एका इंजिनिअरने आत्महत्या केली आहे.त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला त्यामुळे ही घटना उघड झाली आहे. नाशिक शहरातील विक्टोरिया पुलावरून एका इंजिनियरने दिनांक 28 नोव्हेंबरला  सकाळच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिलिंद भास्कर मराठे वय वर्ष 57, राहणार पारिजात नगर गंगापूर रोड नाशिक असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सदर मिलिंद मराठे हे इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करत होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे काम सुटल्याने मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर नाशिक महानगरपालिकेने विक्टोरिया पूलावर सुरक्षा म्हणून थोडी उंच भिंत किंवा जाळी लावण्यात यावी या मुळे आत्महत्या टाळता येतील अशी मागणी नाशिककर करत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा – मुख्यमंत्री