Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळीज पिळवटून टाकणारी घटना : परीक्षेला जाताना भीषण अपघात; तिघे बहिण-भाऊ जागीच ठार

accident
, शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:54 IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर ८, फेब्रुवारी सकाळी  भीषण अपघात झाला. दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. या दुर्घटनेत परीक्षेला जाणाऱ्या तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
या अपघातात प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
 
अपघातातील मृत भाऊ- बहिण हे परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक्क १११ दुचाकी करून चोरट्याने रचला विक्रम,पडल्या बेड्या