Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयद्रावक ! क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

हृदयद्रावक ! क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (17:20 IST)
कोपरगाव शहरात गजानन नगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे लोकेश अर्जुन ढोबळे या तरुणाचा साईसिटी क्रिकेट ग्राउंडवर सिझन बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस करताना छातीत जळजळ होऊन उपचारास नेताना दारुण अंत झाला. 
लोकेश ढोबळे हा तरुण 9 डिसेंबर रोजी दररोज प्रमाणे साई सिटी या ग्राउंडवर  सिझन बॉल  क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी गेला असता त्याने छातीत जळजळ होत असल्याचे मित्रांना सांगितले. मित्रांनी त्याला एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. पण तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. असे करत त्यांनी लोकेशला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी त्याला इतर दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. शेवटी लोकेशला कोपरगावातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले .तिथे डॉक्टरांनीत्याला हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले आणि त्याला मृत घोषित केले. लोकेशला वेळीच औषधोपचार न मिळाल्यामुळे त्याचा दारुण अंत झाला.त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 राज्यांतील या 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, केंद्र सरकारने पत्र लिहून दिला इशारा