Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर भारतात उष्णतेचा कहर तर महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता

weather update
, सोमवार, 10 जून 2024 (12:32 IST)
भारतीय हवामान विभाग नुसार आज 10 ते 13 जून पर्यंत उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिसा, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेची झळ सुरु आहे. तर कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
आज सोमवारी येत्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकण गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तटीय कर्नाटक मध्ये मध्यम पावसासोबत काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
तर तेलंगणा, मराठवाडा, उत्तरी कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, केरळ, अंदमान निकोबारयेथे देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिक्कीम, पूर्वोत्तर भारत, लक्षद्वीप, दक्षिण-पश्चिम मध्यप्रदेश आणि विदर्भ मधील काही भागांमध्ये हलका पाऊस होणार आहे. मध्य अरब सागरमधील शेष विभाग, मुंबई सहीची महारष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच तेलंगणा मध्ये आज मान्सून येणार. 
 
तसेच ओडिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम हिमालयमध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिसा, पंजाब, हरियाणा मध्ये काही भागांमध्ये उष्णतेची झळ कायम असणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश मधील वेगवेगळ्या भागांमध्ये भीषण उष्णता असणार अशी शक्यता वर्तवली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चालवतायेत आघाडी सरकार, किती आव्हानं समोर उभी ठाकलीयेत?