मुंबई, कोकण, पालघर, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. अशातच राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्य़ामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पावसासाठी पुढील २ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व राज्यांमध्ये तर २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळणार आहेत. विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा अंदाज
मुसळधार पाऊसाचा इशारा असलेले जिल्हे ( २२ -२३ सप्टेंबर )
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ
मध्यम आणि हलक्या पावसाच्या सरी (२४ -२५ सप्टेंबर)
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मध्यम आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळणार