Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुढचे 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

Maharashtra Monsoon
, शुक्रवार, 13 जून 2025 (16:41 IST)
राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून येत्या 48 तासांत विदर्भात पाऊस कोसळणार आहे.  पपुढील काही दिवस कोकणात पावसाचा रेड अलर्ट , मध्यमहाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट आणि मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वारे, मेघगर्जने आणि विजांचा कडकडाटासह पाऊस कोसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 
हवामान खात्यानं कोकणात रायगड, सिंधुदुर्ग भागात अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. 
राज्यात अनेक दिवसांपासून थांबलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार असून येत्या 48 तासांत विदर्भात हजेरी लावणार आहे. तसेच मध्य आणि पश्चिम भारताच्या भागाकडे पुढे सरकणार आहे. 
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर मध्यमहाराष्ट्रातील पुणे घाट माथा, कोल्हापूर, नाशिक घाट माथा, कोल्हापूर घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, नाशिक घाट माथा, जळगाव, सोलापूर, सातारा, सातारा घाट माथा, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, अमरावती, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, वाशीम या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 
तर सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, मुंबई 14 तारखेला, रायगड, 13 , 15 ,16 , कोल्हापूर घाट माथा 13,16 सातारा घाट माथा 13, 14, 16  या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
तर 14 आणि 14 तारखेला रायगड आणि शिंदुदुर्ग साठी रेड अलर्ट जारी केला आहे.  
 
Edited By - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WTC Final:ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला