विश्रांती नंतर पावसाने पुन्हा शुक्रवारी आणि शनिवारी दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात संततधार पाऊसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले असून ओसंडून वाहत आहे. तलावातील पाणी साठा वाढला असून आज रविवारी 25 ऑगस्ट रोजी पाऊसाची दमदार हजेरी लागणार असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यानं आज रविवारी मुंबईसह उपनगर, पुणे, कोकण, रायगड, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर साताऱ्यासह कोल्हापुरातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ञानी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्ये अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र किनारापासून उत्तर केरळ किनारपट्टी भागापर्यंत सक्रिय असल्यामुळे आज पाऊस पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता दिली आहे. हवामान विभागाने पालघर, मुंबई, ठाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, पुणे, रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.