राज्यात परतीचा मान्सून पाऊस सुरु झाला असून, जाता-जाताही पावसाने राज्यात जोरदार फटकेबाजी केली आहे. तर पाऊस अजून बाकी आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे.
राज्यात मुख्यतः नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपले आहे. पुढील आठवडा देखील पावसाचा असणार असून, 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात ढगाळी हवामानासह वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
राज्यात नाशिक सोबत खान्देश, औरंगाबाद जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान मेएल सोबतच मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असणार आहे.
सोबतच नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघ गर्जनेसह पाऊस पडेल तर लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल. त्यामुळे पाऊस म्हणतोय की पिक्चर अभी बाकी है.