दिवाळीत मान्सुन बरसणार असल्याच हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rains) आगामी दोन दिवसामध्ये ढंगाच्या गडगडाटांसह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली (IMD) आहे. गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
आज एकूण आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
खरंतर, देशात सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.