सध्या देशात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून ने महाराष्ट्राला व्यापले आहे. काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. सह्याद्री घाट माथ्यावर मान्सून चे आगमन झाले आहे. या अखेरच्या आठवड्यात 30 जून पर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात गेल्या 5 दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनची हजेरी लागली आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई शहर, उपनगर, कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून बंगाल उपसागरीय शाखेत सक्रिय झाल्यामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून सह्याद्रीघाट 1 किमी उंच चढून घाट माथ्यावर वावरत आहे. त्यामुळे खान्देश, नगर सातारा, नाशिक, पुणे,कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांत रविवार 23 जून पासून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.