राज्यात पुणे आणि साताऱ्यात वादळी पावसांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भिंत कोसळून चार जण जखमी झाले आहे.
सातारा जिल्ह्ह्यात खटाव तालुक्यात मायणी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं बाजारातील पटांगणात असलेल्या एका घराची भिंत कोसळून चार जण जखमी झाले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. मायणी -विटा मार्ग आणि मायणी -कातरखटाव मार्ग देखील पावसानं बंद झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मायणीला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर पुणे जिल्ह्यातील पूर्व भागास वादळी पावसानं झोडपले असून पुरंदर तालुक्यत नाझरे सुपे येथे एका शेतकऱ्याच्या घराची पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.