Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार

अखेर हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार
, गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:19 IST)

राज्य शासनाने हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार केलं आहे. केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर आधारित धोरण तयार करण्यात आलं आहे. सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरुपी हेलिपॅड उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या अपघातांनंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेलिपॅड बांधण्यासाठी खुले मैदान, जिल्हा पोलीस परेड मैदान, एमआयडीसीतील मोकळी जागा यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हेलिपॅडची जागा सपाट, मजबूत, हलकेसे गवत असलेली असावी, त्या जागी दगड, डेब्रिज नसावे. हेलिपॅडसाठी निवडलेली जागा ५२ x ५२ मीटर पूर्णपणे मोकळी असावी. हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागेवर हेलिकॉप्टरपासून २४५ मीटर आणि हेलिपॅडपासून ५०० मीटर परिघात कोणताही अडथळा नसावा. हेलिपॅडच्या परिसरात वीज वाहिन्या, डाटा-टेलिफोन केबल, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर अशा कुठलेही उड्डाणात अडथळा आणणारे घटक नसावेत. मानवी वस्त्यांपासून हेलिपॅडची जागा दूर असावी.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डीएसके १ फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा करणार