Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुक्रवारी या ठिकाणी असेल हेल्मेट तपासणी

शुक्रवारी या ठिकाणी असेल हेल्मेट तपासणी
, शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:28 IST)
NASAHIK शहर परिसरात होणारे अपघात आणि त्यातील मृतांची संख्या लक्षात घेवून आजपासून (दि.१) पासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी पोलिस ठाणे निहाय धडाकेबाज कारवाई करण्यात आली. अवघे पोलिस दल रस्त्यावर उतरल्याने बेशिस्तांची चांगलीच धावपळ उडाली. दिवसभरात ५५४ दुचाकीस्वारांनावर कारवाईक करीत पोलिसांनी अडिच लाखाहून अधिक दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, उद्या, शुक्रवारी शहराच्या कुठल्या भागात ही कारवाई असणार आहे त्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
शुक्रवारी दिवसभरात तारवाल सिग्नल, राज स्वीट, सिटी सेंटर मॉल, बाफणा ज्वेलर्स, खुटवड नगर, माऊली लॉन्स, विहित गाव, भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० आणि सायंकाळी ४:०० ते ६:०० यादरम्यान विनाहेल्मेट चेकिंग होईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
 
शहर परिसरात यंदा विनाहेल्मेट ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून २६१ वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले. या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी १ डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार पोलिस ठाणे निहाय बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट, एबीबी चौक, अशोक स्तंभ, गरवारे पॉइंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको महाविद्यालयासमोर आदी ठिकाणी पहिल्या दिवशी बॅरेकेटींग लावून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पोलिसांनी सकाळी दहा ते १२ आणि सायंकाळी पाच ते सात अशी वेळ निश्चित केलेली आहे. या काळात अवघे पोलिस दल रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र वाहनधारकांवर कारवाई झाली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निष्कर्ष वापरणे ही आपली चूक होती असे कबूल केले