महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 48 तास गारपिटीचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणाची खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.
राज्यातील काही भागांत वादळी ऱ्यासह विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे तापमान 45.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. या भागात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा.दिला आहे या भागात 26 एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तर रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत 27 एप्रिल रोजी वादळी वारे व मुसळधार पावसाचा इशारा.देण्यात आला आहे.
28 एप्रिलला नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अलर्ट असणार आहे.