पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर दिलासा दिला आहे. तूर्तास कोणतेही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश देत खडसेंना नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.
आपण सध्या प्रकृती अस्वस्थ्यानं त्रस्त असून तूर्तास कोर्टात हजेरी लावू शकत नसल्याचं त्यांनी कोर्टाला कळवलं. खडसे हे सध्या मुळव्याधानं त्रस्त असल्याचं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितलं. यावर हायकोर्टानं त्यांना आठवड्याभराचा अवधी देत, सत्र न्यायालयात दाद मागण्यासाठी आठवड्याचा अवधी दिला आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.
दरम्यान, भोसरी प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने ताप्तुरता दिलासा दिला होता. त्यांना तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत आठवड्यातून दोनदा ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश दिले न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले आहेत. याप्रकरणी एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टानं वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.