Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hingoli : आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रेत तलवार फिरवल्यामुळे गुन्हा दाखल

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (11:03 IST)
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल हिंगोलीत सभा झाली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील कळमनुरी येथे कावड यात्रा काढली. आमदार बांगर यांनी गळ्यात फुलांचे हार, रुद्राक्षाची माळ, हातात झांज आणि भगवा कपडे परिधान केले होते. 

कार्यकर्ता हार घालून त्यांचे सत्कार करत असताना मधूनच त्यांनी एका कार्यकर्त्याने दिलेल्या तलवारीला म्यानातून  काढूंन फिरवून दंड थोपटून शक्ती प्रदर्शन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या कावड यात्रेत विविध भागातून कार्यकर्त्ये आले होते.आमदारांनी कावड यात्रेत तलवार फिरवल्या प्रकरणी त्यांच्यावर कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच परवानगी न घेता डीजे लावण्यात आला असे पोलिसांनी दाखल केलेल्या या तक्रारीत म्हटले आहे. 
उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेतली असून पक्षफुटी नंतर गद्दारांना त्यांची जागा तुम्हीच दाखवावी असं म्हणत ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांचा वर टीका केली. 

त्याचे प्रत्युत्तर देत आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती त्यात कालिचरण महाराज यांच्या सह हजारोच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. या वेळी संतोष बांगर यांनी म्यानातून तलवार काढून फिरवली आणि ही यात्रा म्हणजे हे हिंदुत्वाचा जल्लोष आहे. हे सर्व शिवसैनिक आणि शिवभक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहे. हे काही शक्ती प्रदर्शन नाही. म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. या कावड यात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले

Maharashtra Election Result : एकनाथ शिंदेंनी प्रिय बहिणींचे आभार मानले

बारामतीतील विजयानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री करावे-पत्नी सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Result: महाराष्ट्रात निकालापूर्वी पोस्टर लागले, अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार?

पुढील लेख
Show comments